मुंबई: रस्त्यांवर ठिकठिकाणी ओसंडून वाहणारे कचऱ्याचे डबे, डब्याभोवतीच्या जागेतही असलेले घाणीचे साम्राज्य आणि येथून नाक धरून चालणारे मुंबईकर... हे चित्र आता बदललं जाणार असून त्यासाठी मुंबई महापालिका जमीन खालील कचऱ्याचे डबे बसवणार आहे. हे मोठे कचऱ्याचे डबे जमिनीच्या आत बसवले जाणार असून, जमिनीच्या वरच्या भागात केवळ त्यात कचरा टाकण्यासाठीची चौकोनी जागा असणारा आहे. जमिनीवरील भागात कचरा पडणार नसल्यानं परिसरात घाणीचं साम्राज्यही दिसणार नाही. खालचा भरलेला कचऱ्याचा डबा वरती घेण्यासाठी हायड्रोलिक जॅकचा वापर केला जाणार आहे. एक अंडरग्राऊंड डस्टबिनची किंमत सुमारे १२ लाख इतकी आहे. या कामासाठीचे टेंडर दोन दिवसांत काढले जाणार आहे. 


नाशिक महापालिकेकडून ६६९ नागरिकांवर कारवाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुंबईत कचरा व्यवस्थापनासाठी नवे पाऊल टाकले जात असतानाच नाशिक महापालिकाही कचरा व्यवस्थापनासाठी काम करत आहे. कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांना नाशिक महापालिकेने मोठा दणका दिलाय. ६६९ नागरिकांवर कारवाई करत ९ लाख ५८ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. कचरा विलगीकरणासाठी शहरात जनजागृतीही कऱण्यात आली होती. घंटागाड्यांवर ध्वनीक्षेपक लावून संदेशही देण्यात आले. तरीही वर्गीकरण न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.


जनतेकडून स्वागत


दरम्यान, नेहमीची दुर्गंधी आणि अस्वच्छता याला वैतागलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या नव्या धोरणाचे स्वागत केले आहे.