Gautami Patil: `पाटील हाय म्हटल्यावर...`, मराठा संघटनेच्या आडनावाच्या आक्षेपावर गौतमी स्पष्टच बोलली; पाहा Video
Gautami Patil On Maratha organization: कधी आक्षेपार्ह नृत्यामुळे (Gautami Patil Dance) तर कधी हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटीलची चर्चा सुरू असते. या ना त्या कारणानं गौतमी कायम चर्चेत राहिलीय. मात्र आता तिच्या आडनावाचा (Gautami Patil Surname) वाद उभा राहिलाय.
Gautami Patil On Surname: आपल्या नृत्यामुळे आणि अदाकारीमुळे अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या मागचे वाद काही थांबायचं नाव घेत नाहीत. कधी आक्षेपार्ह नृत्यामुळे (Gautami Patil Dance) तर कधी हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटीलची चर्चा सुरू असते. या ना त्या कारणानं गौतमी कायम चर्चेत राहिलीय. मात्र आता तिच्या आडनावाचा वाद उभा राहिलाय. त्यामुळे आता आगामी काळात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पाटील आडनावावर गौतमीने रोखठोक वक्तव्य केलंय.
गौतमीच्या आडनावावर मराठा संघटनेचा आक्षेप
मराठा क्रांती ठोक मोर्चानं तिच्या आडनावावरच (Gautami patil surname) आक्षेप घेतलाय. गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार (Gautami Patil Real Surname) आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. त्यामुळे तिनं पाटील आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा थेट इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक राजेंद्र जऱ्हाड-पाटील (Rajendra Jarhad Patil) यांनी दिलाय. त्यावर आता गौतमी पाटीलने आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे.
काय म्हणाली Gautami Patil?
मी या गोष्टींकडे आता लक्ष देणार नाहीये. मला कोणीही काहीही बोलतंय, पण मला फरक पडत नाही. मी कोणाचीही बदनामी करत नाही. माझा कार्यक्रम सांस्कृतिक असतो. तो कार्यक्रम चांगला पार पडला जातो. कोण काय मला नावं ठेवतं, त्याने मला फरक पडत नाही. जर कोणाला माझ्या कार्यक्रमाचे प्रश्न असतील तर त्यांनी माझ्या कार्यक्रमाला यावं आणि माझा कार्यक्रम पूर्ण पहावा, त्यानंतर त्यांनी बोलावं, असा आवाहन गौतमी पाटीलने केलं आहे. मी पाटील आहे मग पाटील वापरणारच ना? असं म्हणत गौतमी पाटीलने (Gautami Patil) या प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं.
पाहा Video
दरम्यान, सबसे कातील गौतमी पाटील असं म्हणत राज्यभर धुमाकूळ घालणारी गौतमी आणि वाद हे जणू आता समीकरण बनलंय. आतापर्यंत कार्यक्रमातल्या राड्यामुळे गौतमी चर्चेत होती मात्र आता तिच्या आडनावाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. गौतमी पाटीलने (Gautami Patil) आपलं मत मांडलंय तर खरं पण हा वाद इथेच थांबणार की आणखी पेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.