Police Officer Ranks : प्रत्येक राज्याची स्वत:ची पोलीस फोर्स आहे. मैदानी आणि लेखी परीक्षेमधून पोलीस कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. पण तुम्हाला माहित आहे का पोलिसांच्या गणेशावर 1,2 किंवा 3 स्टार कधी लागतात? पदोन्नतीनुसार पोलिसांच्या गणवेशात बदल होत असतात. कॉन्स्टेबल ही पोलीस विभागात पहिली महत्त्वाची पोस्ट आहे. पण कॉन्स्टेबलच्या वर्दीवर कोणताही स्टार नसतो. पण यानंतरही कॉन्स्टेबल ही पोस्ट महत्त्वाची मानली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेड कॉन्स्टेबल
पोलीस विभागात हेड कॉन्स्टेबलच्या गणवेशावर काळ्या रंगाचाी पट्टी असते. यावर पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असतात. कॉन्स्टेबलच्या गणवेशावर स्टारऐवजी ही काळ्या-पिवळ्या रंगाची पट्टी असते. काही राज्यात लाल रंगाच्या पट्ट्या असतात. 


पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक
सहाय्यक उपनिरीक्षक म्हणजे असिस्टंट सब इन्सपेक्टर अर्थात ASI ही पोस्ट हेड कॉन्स्टेबलच्या वर असते. सहाय्यक उपनिरीक्षकाच्या गणेशावर एक लाल आणि निळी पट्टी असते. याशिवाय एक स्टार लागलेला असतो. 


पोलीस उपनिरीक्षक
पोलीस उपनिरीक्षकाची पोस्ट अधिकारी स्तरावरची असते. पोलिस उपनिरीक्षक हे पद लष्कराच्या सुभेदाराच्या बरोबरीचं आहे. सब इन्स्पेक्टरच्या गणवेशावर लाल आणि निळ्या रंगाचा पट्टा आणि दोन स्टार असतात.


पोलीस निरीक्षक
पोलीस निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर हा त्या पोलीस ठाण्याचा इंचार्ज असतो. पोलीस निरीक्षकाच्या गणवेशावर एक लाल आणि निळी पट्टी असते. या वर्दीवर तीन स्टार असतात. 


पोलिस उपअधीक्षक (DSP)
पोलीस उपअधीक्षक म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अर्थात DSP. पोलीस उपअधीक्षक म्हणजेच डीएसपी हा  त्या राज्यातील पोलिसांचा प्रतिनिधी असतो. डीएसपीच्या गणवेशावर लाल आणि खाकी रंगाचा बिल्ला असतो आणि तीन स्टार असतात.


सहायक पोलिस अधीक्षक (ASP)
सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणजे असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अर्थात ASP. सहाय्यक पोलीस अधीक्षकाच्या गणवेशावर अशोत स्तंभ असतो. IPS परीक्षा पास झाल्यानंतर हा एका अधिकाऱ्याचा पहिला दर्जा आहे. हे पद लष्कराच्या कॅप्टनच्या बरोबरीचं असतं. 


पोलीस अधीक्षक (SP)
पोलीस अधीक्षक म्हणजे सुपरिटेंडेट ऑफ पोलीस अर्थात SP. पोलिस अधीक्षकांना पोलिस उपायुक्त (DCP) आणि एसपी म्हणूनही ओळखले जातं. त्यांच्या गणवेशावर अशोक स्तंभाचं चिन्ह आणि एक स्टार असतो.


वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP)
वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणजे सीनिअर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अर्थात SSP. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची पोस्टिंग महत्वाच्या शहरांमध्ये असते. त्यांच्या गणवेशावर एक अशोक स्तंभाचं चिन्ह आणि 2 स्टार असतात. 


पोलिस उपमहानिरीक्षक (DIG)
पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजे डेप्युटी इन्स्पेटक्टर जनरल ऑफ पोलीस अर्थात DIG. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या गणवेशावर आयपीएस लिहिलेलं असतं. याशिवाय अशोक स्तंभ आणि तीन स्टार असतात. 


पोलीस महानिरीक्षक
पोलीस दलातील ही सर्वात मोठी पोस्ट. पोलीस महानिरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस अर्थात IG. पोलीस महानिरीक्षकांच्या गणवेशावर तलवारीचं चिन्न आणि स्टार असतो.  तसंच, बॅजवर IPS लिहिलेलं असते.