घाटकोपर दुर्घटनेला रुग्णालय अंतर्गत बदल बांधकामच जबाबदार?
घाटकोपरमधील दुर्घटनेला इमारतीच्या तळमजल्यावरच्या रुग्णालयाचे बांधकामच जबाबदार असल्याचं आता पुढं आले आहे.
मुंबई : घाटकोपरमधील दुर्घटनेला इमारतीच्या तळमजल्यावरच्या रुग्णालयाचे बांधकामच जबाबदार असल्याचं आता पुढं आले आहे.
शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारी सुनील सितप याचं हे रुग्णालय असल्याचं उघड झालेय. त्याने विद्या खाडे नावाच्या महिला डॉक्टरला हे रुग्णालय भाड्यानं चालवायला दिलं होते. सुनील सितपनं रुग्णालयात अंतर्गत बदल केले असताना रहिवाशांनी विरोध दर्शवला होता.
हे बदल करताना आतले कॉलम तोडण्यात आले होते. दीड ते दोन वर्षांपूर्वीच हे हॉस्पिटल सुरू झाले होते, आणि आता तिथे नुतनीकरणाचं काम सुरू होतं. रहिवाशांनी केलेल्या विरोधाला न जुमानता सितपनं जबरदस्तीनं हे काम सुरू ठेवलं होतं. तसंच रहिवाशांना धमकावल्याचंही बोललं जातंय. या बांधकामामुळंच इमारत कोसळल्याचा आरोप रहिवाशांनीही केलाय.