मुंबई : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेत आला. ढिगाऱ्याखाली तब्बल १५ तास दबून असूनही ५७ वर्षीय राजेश जोशी बचावलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सिद्धीसाई अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावर राजेश जोशी आपल्या कुटुंबासोबत राहत होते. इमारत कोसळण्यापूर्वी त्यांची पत्नी रिटा आणि मुलगा दर्शन देवदर्शनासाठी घराबाहेर पडले. काही वेळातच त्यांना फोन आला की ते राहत असलेली इमारत कोसळली आहे. 


त्यांनी आपल्या घरी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वडीलांचा फोन लागत नसल्यानं दर्शन आणि त्याची आई काळजीत होते. त्यातच काही वेळा नंतर दर्शनच्या मोबाईलवर वडीलांचा फोन आला. मला वाचवा , मी आत अडकलो आहे, असं त्यांनी मुलाला सांगितला.


दर्शनने अग्नीशमन यंत्रणेला याबाबत सूचना दिली. शर्थीचे प्रयत्न करीत बचावकार्याची टीम राजेश जोशी यांच्यापर्यंत पोहोचली. ढिगारा अलगद काढत अग्निशमन दलाचा जवान राजेश जोशी यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांना प्रथम पाणी देण्यात आले. जोशी डायबेटीसचे रुग्ण असल्याने  डॉक्टरांच्या साह्याने इन्सुलिन देण्यात आले.  तब्बल १५ तासानंतर राजेश जोशी यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यांच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती जोशी कुटुंबीयांनी आली. त्यातही जवळ मोबाईल असल्यामुळेच त्यांचा जीव वाचला.