मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या रेल्वेमध्ये महिलांची सुरक्षा वा-यावरच असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांच्या डब्यातून प्रवास करणा-या ऋतूजा बोडके या 19 वर्षांच्या तरुणीला, शनिवारी रात्री साडे अकरा वाजता लुटून ट्रेन मधून फेकण्याचा प्रकार घडला आहे. हार्बर मार्गावरच्या नेरूळ - जुईनगर दरम्यानची ही घटना आहे. तीचा मोबाईल, पर्स आणि कानातील रिंगा चोरानं हिसकावल्या. 


यावेळी ऋतूजानं विरोध केला म्हणून आरोपींनी तिला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिलं. त्यावेळी ट्रेन जुईनगर रेल्वे स्थानकात प्रवेश करीत होती. ट्रेनचा वेग कमी झाल्याने खाली पडलेल्या ऋतूजाला गंभीर दुखापत झाली नाही. तिच्यावर वाशीच्या एम जी एम रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.