मुंबई : महिलांवर अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत, यासाठी मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवणे गरजेचे आहेच पण त्याबरोबर मुलांना देखील शालेय जीवनापासून मुलींचा आदर करण्याची समजूत दिली पाहिजे. त्यांची मानसिकता बदलली पाहिजे यासाठी शालेय अभ्यास क्रमात याचा समावेश करणे गरजेचे आहे. मुलींना गुड टच आणि बॅड टच याबाबत शिक्षण दिले पाहिजे. असं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगणघाट जळीतकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. महिलांवरील अत्याचार काही कमी होतांना दिसत नाहीत. गावातील लोकांनी ही रोष व्यक्त करत आहे. गावकऱ्यांनी रास्तोरोको करत आरोपीला गावकऱ्यांच्या स्वाधीन करण्याची मागणी केली. पीडित तरुणीचा मृतदेह घेऊन जेव्हा अॅम्बुलन्स गावात पोहोचली तेव्हा देखील ग्रमास्थांनी रस्ता अडवला. संतप्त ग्रामस्थांकडून गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. 


हिंगणघाटच्या घटनेनंतर आता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. सरकारकडून देखील अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कायदा करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. 


हिंगणघाटच्या घटनेच्या खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली आहे. तसंच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांना हा खटला चालवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.