मुंबई : गोकुळच्या दुधाचे दर राज्यात उद्यापासून वाढणार आहेत. उद्या १ ऑगस्टपासून हे नवे दर लागू होणार आहेत. गोकुळचे गायीचे दूध घेण्यासाठी २  रूपयाने वाढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या गोकूळच्या दुधाचा भाव ३८ रूपये लीटर आहे. आता तोच दर ४० रूपयांवर जाणार आहे. तर गोकूळचे ४० रूपयाचे टोन्ड दूध ४२ रूपये होणार आहे. तर गोकुळ लाईफच्या दूधाचे दर ४२ रुपयांऐवजी ४४ रूपये होणार आहे. 


गोकुळची ही दरवाढ केवळ गायीच्या दुधासाठी आहे. अजूनपर्यंत म्हशीच्या दुधाच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.


राज्यात काही दिवसांपूर्वी शेतकरी संपाची तीव्रता वाढली होती, तेव्हा राज्य सरकारने दूध प्रतीलीटर ३ रूपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 


ही दरवाढ दूध संस्थांना एकतर्फी आणि लादल्यासारखी वाटत होती, म्हणून गोकुळने दूध दरवाढ केली आहे, यानंतर काही खासगी तसेच सहकारी दूध संघही दरवाढ करतील असं सांगण्यात येत आहे.


ग्रामीण भागात गाई, म्हैशीच्या संगोपनाचे काम जिकीरीचे झाले आहे, यासाठी खूप खर्च वाढला आहे, त्यामानाने दूधाला भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.