मुंबई : जागतिक स्तरावरील कमी मागणी आणि ज्वेलर्सकडूनही सोन्याची मागणी घटत असल्याने, सोन्याचे भाव मंगळवारी पुन्हा खाली आहे. सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ३० रूपयांनी घटलं आहेत. सोन्याचा भाव आज मुंबईत प्रति १० ग्रॅम ३० हजार ५६० रूपये, तर  दिल्लीत ३० हजार ६३० रूपयांवर होता. औद्योगिक संस्था तसेच शिक्का निर्मात्यांकडूनही चांदीचे मागणी घटल्याने चांदी ३५५ रूपये घटून ३९ हजार ७१५ वर आलं आहे. जागतिक स्तरावर सोनं मागील १७ महिन्यात सर्वात खाली आलं आहे.


सोमवारी सोन्याच्या भावात ४० रूपयांची घट झाली


जागतिक स्थरावर तसेच घरगुती बाजारातही सोन्याची मागणी घटल्याने सोन्याचा भाव सध्या घसरला आहे. सोमवारी सोनं ४० रूपयांनी खाली आलं होतं. ८ ग्रॅमच्या सोन्याचा भाव २४ हजार ६०० रूपये होता. सोन्यासारखंच चांदी देखील ३५५ रूपयांनी खाली आलं. चांदीचा भाव ३८ हजार ७१५ प्रतिग्रॅम एवढा राहिला.