सोनं महागलं, येत्या काही दिवसात सोन्याचा भाव आणखी...
नवं वर्ष सोनं प्रेमींसाठी काहीसं सुख...तर काहीसं दु:ख घेऊन आलंय...ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी ही खुशखबर ठरत आहे.
मुंबई : नवं वर्ष सोनं प्रेमींसाठी काहीसं सुख...तर काहीसं दु:ख घेऊन आलंय...ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी ही खुशखबर ठरत आहे. मात्र ज्यांना सोनं खरेदी करायचंय त्यांच्यासाठी धक्कादायक अशीच बातमी आहे. कारण सोन्याच्या दराने ४० हजाराचा टप्पा पार केला आहे.
सोनं महागलं
१ तोळ्यासाठी मोजावे लागतायत ४१ हजार रुपये
एका दिवसात १ हजार रुपये वाढले
चांदीने ४८ हजार रुपयांचा आकडा पार केला
दोन दिवसात सोनं-चांदीच्या दरात १५०० रुपयांची वाढ
येत्या काही दिवसात ४५ हजार रुपयांचा आकडा सोनं पार करेल असंही सांगण्यात येतंय
सोनं का महागलं?
१. अमेरिका-ईराण यांच्यातला तणाव
२. शेअर बाजार कोसळला
३. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला
४. अमेरिकेच्या डॉलरमध्येही मोठी घसरण
सोनं महागलं असलं तरी लग्नसराईसाठी नाईलाजाने का होईना सोन्याची खरेदी केली जातेय...
एकुणच नाईलाजाने महागड्या सोन्याची खरेदी होत असली तरीही येत्या काही काळात हेच महागडं सोनं तुमची चांगली गुंतवणूक होऊ शकते.