मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या बाजारात मोठी वाढ दिसून आली. दिल्लीत सोन्याचा भाव 10 ग्राममागे 145 रूपयांनी वाढला. इंडस्ट्रीत आलेल्या डिमांडमुळे चांदीच्या किंमतीतही 240 रूपये किलोमागे वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ ही, रूपया कमजोर झाल्यामुळे झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉलरच्या तुलनेत रूपया कमजोर झाल्याने, सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली असल्याचं सांगण्यात येत आहे.


काय आहे सोन्याची नवी किंमत


HDFC सिक्युरिटीजनुसार, दिल्लीत सोमवारी 145 रूपयांनी सोन्याच्या भावात वाढ झाली, तेव्हा सोने 38 हजार 885 रूपये प्रति 10 ग्रॅम झालं, मागील आठवड्यात सोनं 38 हजार 740 झालं होतं.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं काहीसं वाढलं आहे, 1 हजार 490 डॉलर प्रति औस सोनं आहे, चांदीत देखील 17.57 प्रति डॉलरने वाढ झाली आहे.