मुंबई : सोनेदरात मोठी वाढ होताना दिसत आहे. सातत्याने सोने दरवाढ होत असल्याने सोने दर ४० हजार रुपयांचा टप्पा पार करील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या सोनेदर (सोमवार) २४ कॅरेटचा ३८ हजार ४७० रुपये होता. हा सोनेदर तब्बल २० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात सोने आणखी महागण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनेदरवाढ होत असली तरी सोने खरेदीला लोक प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यावर्षात सोने दरात तब्बल २० टक्के वाढ झाली आहे. या वर्षाअखेरीस सोने १० ग्रॅमचा दर ४० हजार रुपयांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता अधिक आहे. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये सोनेदर प्रति ग्रॅम ३१ हजार ४०० रुपये होता, तो आज ३८ हजार ४७० रुपये झाला आहे.



दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण होताना सोने आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सोने महागले आहे. भारत सोने आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेनुसार सोने दर निश्चित होतात. त्यामुळे सोने दरवाढ सातत्याने होताना दिसत आहे. सण, उत्सव याकाळात सोने खरेदीला प्राधान्य मिळत आहेत. तसेच विवाहांचे मुहूर्त या काळात सोन्याची मागणी अधिक असते. त्यामुळे आगामी काळात सोने आणखी महाग होत जाईल, असे सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


केंद्रा सरकारने सोने शुल्कात १० टक्क्यांवर १२.५ टक्के वाढ केल्यामुळे याचाही परिणाम ही सोनेदरवाढीवर झाला आहे. सोन्याचा दर ३८ हजार ४७० रुपये असला तरी दागिने घेताना त्यात घडणावळीची रक्कम वेगळी असते. त्यामुळे जरी सोने दर ३८,४०० असला तरी त्यामुळे प्रत्यक्ष एका तोळ्याचा दागिना विकत घेताना ३९ हजार रुपयांचा टप्पा पार होत आहे, असे ग्राहकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.