मुंबई : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असताना एक महत्वाची आणि समाधानकारक बातमी समोर आली आहे.  राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. मुंबईत १ आणि ठाणे येथे १ रुग्ण आढळून आला आहे. काल पुण्यात दोघा कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बाजूला कोरोनामुळे संपूर्ण जगात २१ हजार लोकांचा मृत्यू झाला असताना. महाराष्ट्रातून ही सर्वात समाधनकारक बाब समोर आली आहे. संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. फक्त अत्यावश्यक गोष्टी सुरू असून बाकी सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहे.



महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२२ वरून १२८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबई येथे मौलवीचा मुलगा आणि मोलकरीण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. वाशीतील मशिदीत राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या वास्तव्यात आलेल्यांची चाचणी केली गेली. त्यानंतर हे कोरोना पॉझीटीव्ह समोर आले आहेत. यातील काही जणांचे रक्ताचे नमुने यायचे आहेत. त्यामुळे या रुग्णांमध्ये किती रुग्ण पॉझिटीव्ह येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.