मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेत खुशखबर दिली आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास आज राज्य  मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे या निर्णयाची १ जानेवारी २०२२ पासून अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाचा महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या १६ लाख निवासी मालमत्ता यांना लाभ मिळणार आहे. ही कर माफी देण्यात आल्यामुळे पालिकेचा ४७१ कोटी तर राज्याचा ४५ कोटी इतका महसूल कमी होणार आहे.


राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ जानेवारी २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार ५०० चौ. फूट अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांना कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते.