मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मध्य रेल्वेवर ऑक्टोबरमध्ये लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकात लोकल फेऱ्यांमध्ये काही प्रमाणात बदल केले जाणार आहे. त्यानुसार ४० अधिकच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यापुढे जाणाऱ्या काही सेमीफास्ट लोकलच्या फेऱ्या बंद करून त्या थेट फास्ट म्हणून चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्यरेल्वेवरील फास्ट लोकलची संख्या वाढणार आहे.मध्यरेल्वेवर नवीन वेळापत्रकात ४० लोकल फेऱ्या वाढणार असून, त्यात ठाणे ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथपर्यंत १५ फेऱ्यांचा समावेश आहे. 


मध्यरेल्वेवर सध्या १६६० फेऱ्या चालविण्यात येत असून, मेनलाइनवर ८३६ फेऱ्या चालतात. फास्ट फेऱ्यांची संख्या २४३ तर सेमीफास्ट फेऱ्यांची संख्या १७८ इतकी आहे.