मुंबई : कथित गोरक्षकांकडून होणाऱ्या हल्यांविरोधातील जनहित याचिका हायकोर्टानं निकाली काढलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बकरी ईद आणि गणेशोत्सव या एकत्र येणाऱ्या सणांच्या काळांत समाजात तेढ निर्माण होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली आहे, असं पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर सीलबंद अहवालात यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना हायकोर्टासमोर सादर करण्यात आल्या. 


यावर समाधान व्यक्त करत सणासुदिच्या दिवसांत हिंदू-मुस्लिम ऐक्य अबाधित राहणं महत्त्वाचं, असं मत व्यक्त करत हायकोर्टानं ही याचिका निकाली काढलीय. गोरक्षकांविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्यासह पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.