मुंबई: कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिलीय. शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी लवकरच कायदा करणार असल्याचंही ते म्हणालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबाबाई मंदिराबाबतची लक्षवेधी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत मांडली. या लक्षवेधीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती भ्रष्टाचार आणि पुजा-यांचं मुद्दा उपस्थित करण्यात आला. 


याला उत्तर देताना ३ महिन्यांत कायदा करणार असल्याची ग्वाही रणजित पाटील यांनी दिली आहे. पंढरपुर, शिर्डी संस्थांनसाठी केलेल्या कायद्याच्या धर्तीवर हा कायदा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.