मुंबई: सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई बंद आंदोलनावेळी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना जात विचारून बंदोबस्तावर नेमण्यात आल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. तसेच आंदोलन चिघळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानं जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आता सरकार या आरोपांना कशाप्रकारे उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तत्पूर्वी मुंबई बंद आंदोलनामुळे विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी वाहतूक रोखून धरली होती. नवी मुंबई आणि ठाण्यात आंदोलक हिंसक होतानाही पाहायला मिळाले.


कळंबोलीत हिंसक जमावाने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. कोपरखैरणेमध्येही जमावाने गाड्या आणि पोलिसांची चौकी जाळल्याचा प्रकार घडला. कळंबोलती जमावाला नियंत्रणात आणताना झालेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमीही झाला.