सातारा जिल्हा बँक भरती प्रक्रिया सरकारने केली रद्द
सातारा जिल्हा बँक भरतीत झालेल्या गैरव्यवहारानंतर ही पूर्ण भरती प्रक्रियाच सरकारने रद्द केली आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सातारा जिल्हा बँक भरतीत झालेल्या गैरव्यवहारानंतर ही पूर्ण भरती प्रक्रियाच सरकारने रद्द केली आहे.
सातारा जिल्हा बँक नोकरभरतीत संचालक मंडळाने भरती करणाऱ्या कंपनीशी संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे आरोप झाले होते. याप्रकरणी काही उमेदवार न्यालायातही गेले होतं. भरतीसाठी उमेदवारांकडून १० ते १५ लाख रुपये घेतल्याचे आऱोपही याप्रकरणात झाले होते.
सातारा जिल्हा बँक भरती
सात महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा बँकेतील 376 पदांच्या भरतीसाठी जाहीरात काढण्यात आलो होती. यासाठी तब्बल १० हजार जणांनी अर्ज केले होते. या उमेदवारांची परीक्षाही घेण्यात आली. मात्र जे उमेदवार उत्तीर्ण झाले त्याऐवजी दुसऱ्याच उमेदवारांची भरती झाल्याप्रकरणी या भरतीला आक्षेप घेण्यात आला होता. काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी याप्रकरणात मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार या भरतीप्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानं ही भरती प्रक्रियाच शासनाने रद्द केली आहे.