मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघालेला मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. मोर्चा मुंबईत पोहोचताच राज्य सरकारनंही पावलं टाकायला सुरुवात केली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या समितीमध्ये एकूण ६ मंत्री असतील. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख हे मंत्री या समितीमध्ये असतील.


शेतकरी मध्यरात्री आझाद मैदानाकडे जाणार


शेतकरी मोर्चा सध्या सोमय्या मैदानामध्ये असून मध्यरात्री १२ नंतर मोर्चा आझाद मैदानाकडे जाईल. १०वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, त्यांना अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं अजित ढवळे यांनी सांगितलं.