मुंबई : मुंबई उपनगर तसेच पुण्यातील कोट्यवधी रुपयांच्या भूखंडातील गैरव्यवहार लोकलेखा समितीने समोर आणले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकलेखा समितीने या तीन ठिकाणच्या 113 भूखंडांच्या प्रकरणाची चौकशी केली असता, त्यातील तब्बल 100 भूखंड प्रकरणात गैरप्रकार, त्रुटी आणि चुका आढळून आल्या आहेत. 


काही प्रकरणात तर अर्ज नसतानाही सराकरने भूखंड वाटप केल्याचा गंभीर प्रकार लोकलेखा समितीने समोर आणला आहे. काही भूखंडांचे करारनामेच करण्यात आलेले नाहीत. 


भाडेपट्ट्यावरील भूखंड वितरणात अवलंबलेली कार्यपद्धती त्रुटी असून यात सुसुत्रता, पारदर्शकता नसल्याचे लोकलेखा समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केलंय. 


काही भूखंडांच्या प्रकरणात 30 ते 40 वर्षापासून भाडेपट्टा संपुष्टात येऊनही त्याचे नुतणीकरण करण्यात आलेले नाही. तसेच अनेक प्रकरणात भूखंड वाटप करताना घातलेल्या अटींचे उल्लंघन होऊनही जमीन ताब्यात घेण्यात आलेल्या नाहीत.
 
लोकलेखा समितीने भूखंडवाटपातील अशा अनेक गंभीर बाबी समोर आणल्या असून यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका अहवालात ठेवला आहे.