मुंबई : राज्यातील महाराष्ट्र विकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पोलिसांना लवकरच खूषखबर देण्याची शक्यता आहेत. म्हाडाच्या घरांमध्ये १० टक्के घरे पोलिसांसाठी राखीव ठेवण्याचा ठाकरे सरकारचा विचार आहे. त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. पोलिसांसह चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठीही १० टक्के घरे राखीव ठेवण्याचा प्रस्ताव असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. म्हाडाचे एक पैशाचंही नुकसान न करता विकास करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुंबईत घाटकोपर इथल्या शांतिसागर प्रकल्पात अधिकचे सातशे फ्लॅट लॉटरी पद्धतीने पोलिसांनाच देण्यात येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून वादामुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी घाटकोपरमधील शांतिसागर प्रकल्पातिल घरे पोलिसांनाच देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येथील ७०० फ्लॅट पोलिसांना देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. आता त्यांनी म्हाडात पोलिसांसाठी १० टक्के घरे देणार असल्याचे म्हटले आहे.