मुंबई : मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालये काही दिवस बंद ठेवण्याचा विचार सरकारचा करते आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. शासकीय कार्यालयात कामा निमित्त अनेक जण येत असतात. त्यामुळे शासन शासकीय कार्यालये काही दिवस बंद ठेवण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 39 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय़ घेतले आहेत. आज मंत्रालयात बैठक होत आहे. यामध्ये आणखी काही महत्त्वाचे निर्णय़ घेतले जावू शकतात.


याआधी सरकारने शाळा आणि महाविद्यालय 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला होता. सोबतच मॉल, सिनेमागृह तसेच गर्दी होणारी ठिकाणं बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सोबतच राज्यातील अनेक महत्त्वाची देवस्थानांमध्ये दर्शन देखील पुढीसल सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.


आज मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचं निधन झालं. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला. कोरोनाची लागण झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. दुबईहून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १२४ वर पोहोचली आहे.