`शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर`
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलय.
मुंबई : शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय.
महागाईवरुन सेनेनं केलेलं आंदोलन चुकीच असल्याचही ते म्हणाले. स्वच्छता अभियानांतर्गत मुबंईत रामदास आठवले यांनी मुंबईत चैत्यभूमि इथं स्वच्छता केली, यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देऊ शकते. तसंच राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ आमदारांची गरज पडेल. हे १५ आमदार भाजपला पाठिंबा देतील कारण त्यांना तीन वर्षांमध्ये निवडणूक नकोय, असा दावा रामदास आठवलेंनी केला आहे.
दरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा आहेत. यावरही रामदास आठवलेंनी भाष्य केलं आहे. नारायण राणेंनी आरपीआयमध्ये यावं. नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा आरपीआयला होईल. अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिलीये.