मुंबई : राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार यांच्यातील संघर्ष दिसून येत आहे. हा संघर्ष अधिक वाढू नये तर तो तात्काळ मिटविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिनर डिप्लोमसी दिसून आली आहे. आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट 'मातोश्री'वर झाली. मातोश्रीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी स्नेह भोजनासाठी एकत्र आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



यावेळी कौटुंबीक स्नेहभोजनही 'मातोश्री'वर होणार आहे. गेले दोन महिने राज्यात जे सत्ताकारणाचे राजकारण सुरू होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शिवसेना यांच्यातील संबध फारसे चांगले नसल्याचे दिसून आले होते. नुकत्याच झालेल्या मित्रमंडळ विस्ताराच्या वेळीही राज्यपालांनी अनेक मंत्री शपथ घेत असताना नियमांवर बोट ठेवत आक्षेप घेतला होता. 
काँग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी यांना शपथ परत घ्यायला लावली होती.


त्यामुळे पुढील काळात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पहायला मिळणार असल्याचीही राजकिय वर्तुळात चर्चा होती. पण आज अचानक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्नेह भोजनासाठी थेट 'मातोश्री'वरच दाखल झालेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात स्थिर सरकार चालवण्यासाठी राज्यपाल आणि सरकार यांच्यात चांगले संबध निर्माण करण्यासाठीच आजच्या स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.