खातेवाटपावर राज्यपालांचे शिक्कामोर्तब
मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या यादीला मंजुरी
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटून गेल्यावर अखेर आज खातेवाटपावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी खातेवाटपावर स्वाक्षरी करून ही यादी मंजुर केली आहे. याबाबत त्यांनी अधिकृत घोषणा देखील केली आहे.
शनिवारी संध्याकाळी राज्यपालांकडे महाविकासआघाडीच्या सरकारच्या खातेवाटपाची संपूर्ण यादी देण्यात आली होती. खातेवाटपाला आधीच उशिर झाल्यामुळे सरकारवर टिका होत होती. अशातच राज्यपालांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत या खातेवाटपाच्या यादीवर स्वाक्षरी केली नव्हती.
त्यानंतर आज रविवार असल्यामुळे मंजुरी होईल की नाही यात शंका होती. मात्र अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी स्वाक्षरी करून या महाविकासआघाडीच्या सरकारच्या खातेवाटपाला मंजुरी दिली आहे.
सह्याद्री अतिथीगृहात शनिवारी संध्याकाळी अधिकृत बैठक झाल्यानंतर
राजभवनावर 4 वाजता स्वाक्षरी करता खातेवाटपाची यादी पाठवण्यात आली होती. मात्र त्यावर राज्यपालांनी सही केली नव्हती. यामुळे साऱ्यांचे लक्ष याकडेच लागून राहिले होते. तसेच आज रविवार असल्यामुळे स्वाक्षरी होईल की नाही यात शंका वर्तवली जात असताना अखेर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे.
महाविकासआघाडीचे मंत्री बिन खात्याचे मंत्री म्हणून आठवडाभर फिरत होते. आता खातेवाटप झाले असले तरीही कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रीपद कळले आहे पण राज्यमंत्र्यांना मात्र अद्याप आपली जबाबदारी कळलेली नाही. अखेर आज सगळ्या मंत्र्यांना खातेवाटप होईल.
महाविकासआघाडीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची संपूर्ण यादी
शिवसेना यादी
एकनाथ शिंदे : नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (MSRDC)
सुभाष देसाई : उद्योग
आदित्य ठाकरे : पर्यावरण आणि पर्यटन
संजय राठोड : वने
दादा भुसे : कृषी
अनिल परब : परिवहन आणि संसदीय कार्य
शंकरराव गडाख : मृदू जलसंधारण
संदीपान भुमरे : रोजगार हमी
उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण
मुख्यमंत्री- सामान्य प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा
राष्ट्रवादीची यादी
अजित पवार - वित्त व नियोजन (अर्थमंत्री)
जयंत पाटील - जलसंपदा
छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा
अनिल देशमुख - गृह
दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क व कौशल्य विकास
धनंजय मुंडे - सामाजिक न्याय
हसन मुश्रीफ - ग्रामविकास
बाळासाहेब पाटील - सहकार व पणन
राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन
राजेश टोपे - आरोग्य
जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
नवाब मलिक - कामगार, अल्पसंख्याक विकास
काँग्रेसची यादी
बाळासाहेब थोरात -महसूल
अशोक चव्हाण- सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत- ऊर्जा
विजय वड्डेटीवार- ओबीसी ,खार जमिनी,मदत आणि पुनर्वसन
के.सी.पाडवी- आदिवासी विकास
यशोमती ठाकूर- महिला व बालकल्याण
अमित देशमुख- वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
सुनील केदार- दुग्ध विकास व पशुसंवर्धन
वर्षा गायकवाड- शालेय शिक्षण
अस्लम शेख- वस्त्रोद्योग,मस्तव्यवसाय, बंदरे
सतेज पाटील- गृह राज्यमंत्री (शहर)
विश्वजित कदम- कृषी आणि सहकार राज्यमंत्री