मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण
राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आलं. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांन मुंबईतल्या रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात त्यांच्यावर कोरोनासंदर्भात उपचार करण्यात येणार आहेत.
दरम्यान सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी येणार होते. राज्यपालांची भेट घेऊन एकनाथ शिंदे त्यांना पत्र देणार होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
दरम्यान, मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर सूरतमध्ये हालचालींना वेग आला आणि तीन वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना गुवाहाटीच्या दिशेनं हलवण्यात आलं.
विमानतळावर पोहोचताच शिंदेंना माध्यमांनी घेरलं, त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली, 'माझ्याकडचा गट हीच खरी शिवसेना आहे', असं म्हणत शिंदेंनी आपण बाळासाहेबांचं हिंदुत्त्वं पुढे नेणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.
आपल्यासोबतीनं तब्बल 40 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला. जाणकार आणि काही अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेचा वेगळा गट शिंदे स्थापन करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गटाची माहिती राज्यपालांनाही देण्यात येणार आहे.
दरम्यान आता राज्यपाल कोरोनामुळे रूग्णालयात दाखल असताना मुंबईत आल्यानंतर शिंदे नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.