मुंबई: राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. १५ जुलैनंतर या परीक्षा होणार आहे. या परीक्षांचा नियोजित आराखडा घेऊन गुरुवारी अमित देशमुख राजभवनावर गेले होते. या भेटीनंतर राजभवनाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये राज्यपालांनी कोरोनाच्या संकटकाळात परीक्षांचे नियोजन करणाऱ्या अमित देशमुख यांचे कौतुक केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजभवनावर येणाऱ्या 'चक्रम वादळां'पासून सावध राहा; शिवसेनेचा राज्यपालांना खोचक सल्ला


तर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याासाठी असमर्थता दर्शविणारे राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कानपिचक्या दिल्याचे समजते.  राज्यपाल व राज्य सरकारमध्ये सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरून वाद सुरु आहे. विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा झाल्याच पाहिजेत, असा राज्यपालांचा आग्रह आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागच्या सत्रातील गुणांचे मूल्यांकन करुन सरासरी गुणवाटप करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, राज्यपाल अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी आग्रही आहेत.


आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी


 


या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मात्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याची तयारी दाखविली आहे. यासाठी काल अमित देशमुख राज्यपालांना भेटले होते. त्यावेळी अमित देशमुख यांनी सादर केलेल्या वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखडयाला राज्यपालांनी मंजूरी दिली.