दहिहंडीसाठी किती थरांना मिळणार मान्यता?
दहीहंडी उत्सव तोंडांवर आला असतांना मानवी थरांची उंची काय असावी.
मुंबई : दहीहंडी उत्सव तोंडांवर आला असतांना मानवी थरांची उंची काय असावी, याबाबत अद्याप राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही.
7 ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देतांना 20 फुटापेक्षा जास्त उंचीचे मानवी मनोरे असावेत की नाही हे ठरवण्याची जवाबदारी कायदा बनवण्याचे अधिकार असलेल्या विधिमंडळवर सोपवली होती.
मात्र पावसाळी अधिवेशन संपले तरी विधिमंडळने याबाबत निर्णय घेतला नाही. तेव्हा आता राज्य सरकार अध्यादेश काढण्याची, निर्णय घेण्याची शक्यता आहे. 8 किंवा 9 मानवी मनो-याच्या आग्रह बहुसंख्य दहीहंडी मंडळानी धरला आहे.
तेव्हा दहीहंडी उत्सवात घुसलेलं राजकीय पक्षांचं राजकारण आणि राजकीय नेत्यांकडून उंच दहीहंडी उस्तवाचं केलं जाणारं आयोजन लक्षात घेतात राज्य सरकार आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष आहे.