मुंबई : अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान झालं आहे. सत्ताधारी पक्षानं २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत महाआघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. याआधी भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी कागदपत्रे, निकषाच्या लालफिती तात्काळ बाजूला करुन शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या, अशी जोरदार मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधी केली होती. शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे बँकांनी कर्जवसुलीच्या नोटीसा तात्काळ थांबव नाहीतर शिवसेनेशी गाठ आहे. असा इशारा ही त्यांनी दिला होता. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली होती. त्य़ावेळी त्यांनी 25 हजार हेक्टरी मदतची घोषणा केली होती. फडणवीस सरकारने त्यावेळी केलेली १० हजार कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.


शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना देखील देवेंद्र फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. आता चित्र बदललं आहे. आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे या मुद्द्यावर उद्धव ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. याची सुरुवात पहिल्याच दिवसापासून सुरु झाल्याचं दिसतं आहे.