एसआरए योजनेतील घरांचं क्षेत्रफळ वाढण्याचा सरकारचा विचार
घरांसंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. एसआरए योजनेअंतर्गत घरांचं क्षेत्रफळ 315 चौरस फूट करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
मुंबई : घरांसंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. एसआरए योजनेअंतर्गत घरांचं क्षेत्रफळ 315 चौरस फूट करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
सध्याची क्षेत्रफळाची मर्यादा
सध्या या घरांच्या क्षेत्रफळाची मर्यादा २६९ चौरस फुट इतकी आहे. ती वाढवून केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेतल्या घरांप्रमाणे ३१५ चौरस फूट करण्याचा सरकारचा विचार आहे.
अहवाल सादर करण्याचे आदेश
अशाप्रकारे घरांचं क्षेत्रफळ वाढवलं तर सध्या सुरू असलेल्या योजनांमधल्या घरांबाबत काय निर्णय घ्यायचा, यासाठी एक समिती नेमण्यात आलीय. या समितीला तीन महिन्यांत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाने दिले आहेत.