COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया आज पार पडतेय. 271 मतदान केंद्रात हे मतदान पार पडत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान करण्याची वेळ असणार असून, मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे , कोकण आणि मुंबई मद्ये हे मतदान पार पडणारआहे.. या निवडणुकीसाठी जवळपास 70 हजार पदवीधर मतदारांनी नोंदणी केलीय. मुंबई पदवीधर उमेदवार विलास पोतनीस यांनी बभाई म्युनिसिपल शाळेत मतदानाचा हक्क बजावला. जोरदार पावसानं मतदानावर परिणाम झाला, तरी शिवसेनेचा विजय नक्कीच होईल असा विश्वास पोतनीस यांनी व्यक्त केला.


शिवसेना विरुद्ध भाजप 


मुख्यत्वे ही चौरंगी लढत होतेय. त्यात थेट शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. विलास पोतनीस हे शिवसेनेचे तर भाजपकडून अमित मेहता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस- शेकाप पुरस्कृत पुरोगामी पदवीधर आघाडीचे राजू कोरडे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पुरस्कृत मनसेचा पाठिंबा मिळवलेले राजू बंडगर हे उमेदवारही आपलं राजकीय भवितव्य आजमावताहेत. चारही उमेदवारांना स्वतः च्या विजयाचा आत्मविश्वास आहे.