मुंबई : जीएसटीचे दर कमी झाल्यावरही बड्या हॉटेल्समध्ये ग्राहकांची लूटालुट सुरुच असल्याची तक्रार, आज भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातल्या अधिका-यांकडे केलीय. 


सर्व हॉटेल्सवर फक्त 5 टक्के जीएसटी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालपासून देशातल्या सर्व रेस्टॉरंट्सवर लावण्यातक येणाऱ्या जीएसटीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. आता सर्व हॉटेल्सवर फक्त 5 टक्के जीएसटी आकराण्यात येणार आहे. याचा फायदा लहान हॉटेल्सनी ग्राहकांना देण्यास सुरुवात केलीय. 


ग्राहकांना दरकपातीचा फायदा देत नाहीत


पण मोठ्या हॉटेल चेन्सनी मात्र ग्राहकांना हा दरकपातीचा फायदा दिलेला नाही. उलट दर वाढवण्यात आल्याची बिलं सोमैय्यांनी पुराव्यादाखल मंत्र्यालयाच्या अधिका-यांना दिली आहेत. शिवाय दर तातडीनं कमी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.