मंत्रालयासमोर आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणानंतर मंत्रालयासमोर आणखी एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडलीय.
मुंबई : धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणानंतर मंत्रालयासमोर आणखी एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडलीय.
५० वर्षीय गुलाब शिंगारे नावाचे व्यक्ती आपल्या जमिनी संदर्भात तक्रार घेऊन मुंबईत दाखल झाले होते. शिंगारे मूळचे बीड जिल्ह्यातील माजलगावचे रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीला योग्य उत्तर न मिळाल्यानं त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
शिंगारे यांचा हेतू लक्षात आल्यानंतर तत्काळ हस्तक्षेप करत मरीन ड्राईव्ह पोलिसांनी शिंगारे यांना ताब्यात घेतलंय.