मुंबई : शरद पवारांच्या घरावर हल्ला प्रकरणी चौकशी होणार आहे. आता याच प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी होणार आहे. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेताना गुणरत्न सदावर्ते यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या हत्येचा कट सुरु असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांच्या घरावर आज एसटी कर्मचाऱ्यांनी धडक देत आंदोलन केलं. शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या मागे अज्ञात व्यक्तींचा हात असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं होतं.


एसटी आंदोलकांना हल्लेखोर म्हणू नका. कष्टक-यांची भावनाही लक्षात घ्या, असं  एसटी कर्मचा-यांचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं होतं. संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. लाय डिटेक्टर टेस्ट करा, असंही ते म्हणाले होते. एसटी कर्मचा-यांना सरकारनं वा-यावर सोडलं. ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली नाही, अशी टीका सदावर्तेंनी केली होती.