Shinde Group Guwahati Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांच्यासह शिंदे गटातील (Shinde Group) मंत्री व आमदार यांचा गुवाहाटी (Guwahati) दौरा एकदम फायनल झाला आहे.  शिंदे गटाचे सर्व आमदार 21 नोव्हेंबरला गुवाहाटी दौऱ्यावर जाणार होते. मात्र, 21 तारखेचा दौरा रद्द करण्यात आला आणि नवी तारीख जाहीर करण्यात आली.  शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार (MP, MLA) कुटबासह 26 नोव्हेंबरला संध्याकाळी गुवाहाटीला जाणार आहेत.  27 नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसिद्ध कामाख्या देवीचे (Kamakhya devi Temple) दर्शन घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुवाहाटी दौऱ्यासाठ विमान बूक
गुवाहाटी दौऱ्याची शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. गुवाहाटीसाठी शिंदे गटाकडून एअर इंडियाचं (Air India) विशेष विमान बूक करण्यात आलं आहे. 180 जणांसाठी विमान बूक करण्यात आलं असून आमदार, खासदार आणि त्यांचं कुटुंबिय गुवाहाटीला जाणार आहेत. 26 आणि 27 असा दोन दिवसांचा गुवाहाटीचा दौरा आहे.


आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून जंगी स्वागत
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे गुवाहाटीत जंगी स्वागत करणार आहेत.  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाळीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेवून प्रथम सुरतला गेले. यानंतर त्यांनी या आमदारांना घेऊन थेट गुवाहाटी गाठली. शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या डायलॉगलमुळे गुवाहाटी चर्चेत आलं होतं.   


हे ही वाचा : 'आत्मविश्वासाला धक्का लागलेली व्यक्ती ज्योतिषाकडे जाते' शरद पवार यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका


कामाख्या देवीचा नवस फेडणार
शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (MLA Bachchu kadu) यांनी काही दिवसांपूर्वीच सर्व आमदार गुवाहाटीला जाणार असल्याचं सांगितलं होतं. आम्ही कामाख्या देवीला नवस केला होता. तो नवस या दौऱ्यात फेडणार आहे. राज्यात दिव्यांग मंत्रालय व्हावं, बळीराजाचं भलं व्हावं, यासाठी कामाख्या देवीला नवस केला होता असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.