मुंबई : पोलीस आयुक्त बृहन्मुंबई आस्थापनेरील रिक्त १५६ पोलीस शिपाई (चालक) पदांसाठी दिनांक ३०/११/२०१९ रोजी जाहीरात देण्यात आलेली होती. या प्रक्रियेतील लेखी परीक्षा (ऑफ लाईन) दिनांक १०/१०/२०२१ रोजी ११.०० वाजता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मधील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस शिपाई (चालक) परीक्षेकरीता उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र (HALL TICKET) दिनांक ०३/१०/२०२१ पासुन https://mhpolicebharti.cbtexam.in/  या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी या लिंकवर बृहन्मुंबई पोलीस घटक निवड करून लॉगईन करावे. त्यानंतर परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.


लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावरील सर्व सुचनांचा अवलंब करून नमूद परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र आणि ओळख पुराव्यासह विहित वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. या परीक्षेबाबत उमेदवारांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतकक्ष क्रमांक १८००२१००३०९ वर संपर्क करता येईल.


प्रवेशपत्र (HALL TICKET) बाबत उमेदवारांना नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांकावर देखील सूचित करण्यात आले आहे.