राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : आपल्या आयुष्यातील तब्बल सहा वर्ष पाकिस्तानातल्या तुरुंगात व्यतीत करणारा हामिद अन्सारी आता मुंबईत परतलाय. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या हामिद निहाल अन्सारी सोशल वेबसाईट फेसबुकवर चॅटिंग करता करता एका पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमात पडला होता. नोव्हेंबर २०१२ मध्ये आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी हामिद पाकिस्तानात दाखल झाला होता. तिथं त्याला अटक करण्यात आली. हामिदच्या सुटकेसाठी त्याच्या आईनं- फौजिया यांनी दिवस-रात्र एक केली होती. आता सहा वर्षानंतर त्यांच्या मेहनतीला फळ आलं आणि त्यांचा मुलगा अखेर भारतात परतलाय... पण, हामिद आता एक धडा मिळालाय... 'फेसबुकवरचं प्रेम नको रे बाबा' म्हणत त्यानं हा धडा आता इतरांशीही शेअर करायचा ठरवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिक वाचा :- ...अन् पाकिस्तानात हामीदला मिळाली आईची माया


निहालनं आपण या बंदीवासातून तीन मोठे धडे घेतल्याचं सांगितलंय. पहिला म्हणजे, फेसबुकवरून कुणाच्याही प्रेमात पडू नका... दुसरं म्हणजे, आपल्या आई-वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका... कारण आपल्या वाईट परिस्थितीत तेच आपली सोबत करतात आणि तिसरा म्हणजे, कुठेही जाण्यासाठी अवैध मार्गांचा वापर करू नका... 


अधिक वाचा :- पाकिस्तानमध्ये माझा छळ झाला, डोळ्याला दुखापत- हमीद अन्सारी


पाकिस्तानात हामिदला भारतीय गुप्तहेर ठरवण्याता आलं होतं... त्याच्यावर अवैध मार्गानं पाकिस्तानात प्रवेश करणं, प्रवेशासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर करणं आणि पाकिस्तानविरोधी कारवायांत सहभागी होण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. गेल्या गुरुवारी पेशावर हायकोर्टानं हामिदच्या याचिकेवर सुनावणी केली. खोटी कागदपत्रं बनवणाऱ्या आरोपीला जास्तीत जास्त एका महिन्याची कैद मिळू शकते, अशावेळी शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही आरोपीला तुरुंगात कसं ठेवलं जाऊ शकतं? असा प्रश्न विचारत कोर्टानं हामिदच्या सुटकेसाठीची औपचारिक कारवाई एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.