मुंबई : रेल्वे रुळाला तडा गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुनाभट्टी - कुर्ला दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याने पनवेलच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 


सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रुळाला तडा गेल्याचं निदर्शनास आलं. यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे. 


सकाळची वेळ आणि सोमवार असल्याने नोकरदार वर्ग, शाळा-कॉलेजेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. त्यातच रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे.