मुंबई : मुंबईच्या हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जुईनगर स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मोटरकोचमधून अचानक धूर येऊ लागल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायर आणि पेंटाग्राफमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही.


हार्बर मार्गावरच्या जुईनगर स्थानकाव संध्याकाळी सहाच्या सुमारास ठाण्याच्या दिशेने जाणा-या लोकलच्या मोटारकोचमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात धुर येऊ लागला. जुईनगर स्थानकात यामुळे सगळीकडे धुर पसरला होता. यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या वाहतूक बंद आहे. लोकल कार्डशेडकडे रवाना केली जात आहे.