मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं
रेल्वे प्रशासनाला फटकारलं
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं आज पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाला फटकारलं आहे. ज्यांना प्रवास करायचा नाही अशा नागरिकांना रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश का मिळतो असा सवाल उच्च न्यायालयानं केला आहे. मुंबईच्या रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. अशात ज्यांचं प्रवासाचं काहीही प्रयोजन नाही अशांना प्रवेशच का देता असा प्रश्न उच्च न्यायालयानं विचारला आहे.
प्रवासी एक असतो, त्याला सोडायला १० जण स्टेशनवर येतात. येणाऱ्यांचं त्यात एखाद्या नातेवाईकाचं प्रवाशावर इतकं प्रेम असतं की तो नातेवाईक त्याचा हात पकडतो. तू जाऊ नकोस ना असं लडीवाळ स्वरात म्हणतो. मग उरलेले दहा जणही तोच आग्रह धरता. हे सगळं रेल्वे स्टेशनवर घडतं. याची खरचं गरज आहे का? असं निरीक्षण वजा सवालही उच्च न्यायालयानं केला.