मुंबई : खासगी क्षेत्रातील सर्वाधिक उलाढाल असलेल्यापैकी एक बँक म्हणजे (HDFC Bank) एचडीएफसी बॅंक. एचडीएफसी बॅंकेच्या खातेधारकांसाठी वाईट बातमी आहे.  एचडीएफसी बॅंकेने विविध कालावधींच्या सर्व प्रकारच्या कर्जांसाठी एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या वाढीच्या निर्णयांमुळे सर्वसामांन्यांना झटका बसला आहे. (hdfc bank once again increased rate of mclr know new interest rate) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेकडून एमलीएलआरमध्ये 20 बेसिस प्वॉइंटने वाढ केली आहे. या वाढीमुळे आता एचडीएफसी बँकेतून ज्यांनी गृह, वैयक्तिक आणि वाहन कर्ज घेतलं असेल, त्यांच्या हफत्यात आणखी वाढ होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून (7 जुलै) करण्यात आली आहे. 


एमसीएलआरमध्ये 20 बेसिस पॉइंट्सने वाढ केल्याने आता एकूण दर हा 7.70 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे आता एका महिन्याच्या कालावधीसाठीचा दर 7.75 टक्के, 3 महिन्यांच्या कालावधीसाठी  7.80 टक्के आणि 6 महिन्यांच्या कालावधीसाठी हा दर 7.90 टक्के इतका झाला आहे. तर एका वर्षासाठी एमसीएलआरमध्ये वाढ केल्याने नवा दर हा 8.05 टक्के इतका झाला आहे. याबाबतची माहिती बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.


महिन्याभरात 35 बेसिस पॉइंट्सने वाढ


एचडीएफससी बँकेकडून गेल्या महिन्याभरात दरात 35 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. या वाढीची अंमलबजावणी ही 7 जूनपासून करम्यात आली. एचडीएफसीकडून महिन्याभरात बेसिस प्वॉइंट्समध्ये दुसऱ्यांदा बदल केला गेला आहे.


काही दिवसांपूर्वी आरबीआयने रेपो आणि रिव्हर्स रेपा दरात वाढ केली. त्यानंतर विविध बँकांनी कर्ज दरात वाढ केली होती. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 8 जूनला रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केवी होती. याआधी तडकाफडकी 40 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली. म्हणजेच एका महिन्यात 90  पॉइंट्सने वाढ झाली आहे.