सावधान ... मुंडकं तुटलेला विषारी साप चावला तरी जीव जावू शकतो
आता बातमी आहे एका खतरनाक सापाविषयीची...भारतात सापाची एक अशी प्रजाती आहे, ज्याची मुंडकी कापल्यानंतरही तो जीवघेणा ठरू शकतो.
मुंबई : आता बातमी आहे एका खतरनाक सापाविषयीची...भारतात सापाची एक अशी प्रजाती आहे, ज्याची मुंडकी कापल्यानंतरही तो जीवघेणा ठरू शकतो. सर्वात घातक सापापासून सावध राहा ! भारतात जगातील सर्वात विषारी साप, सापाचं कापलेलं मुंडकंही माणसावर जीवघेणा हल्ला करतं. साप, नुसतं नाव जरी काढलं तरी अंगावर काटा येतो. सापाला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडते. साप चावल्यानं दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो.
मात्र भारतात सापाची एक अशीही प्रजाती आहे, ज्याला जगातला सर्वात विषारी साप म्हणून ओळखलं जातं. या सापाची मान कापली तरीही तो जीवघेणा हल्ला करू शकतो.
जगभरात या सापाला किंग कोब्रा या नावानं ओळखलं जातं. तर भारतात त्याला नाग असं म्हंणतात..चीनमध्ये एका शेफनं सूप बनवण्यासाठी किंग कोब्राची मान कापली. मात्र किंग कोब्राची हीच मान त्याच्यासाठी जीवघेणी ठरली.
किंग कोब्रामध्ये कार्डियोटॉक्सीन आणि सिनोप्टिक न्यूरोटॉक्सीन नावाचं विष असतं. हा साप चावल्यानंतर त्याचा परिणाम शरीरातल्या न्यूरो सिस्टमवर होतो. त्यामुळे पॅरालिसीस होऊ शकतो.
या सापाचं विष इतकं घातक असतं की त्यामुळे अंधत्वही येऊ शकतं. सापाचं विष शरीरात भिनल्यास हृदयाची गती कमी आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. कोब्राच्या जवळपास 300 प्रजाती आहेत.
WHOच्या माहितीनुसार जगभरात दरवर्षी 50 लाख लोकांचा मृत्यू साप चावल्यानं होतो. यातले बहुतांश साप हे बिनविषारी असतात. मात्र केवळ साप चावलाय या भीतीनेच अनेकांचा जीव जातो. त्यामुळे सापापासून सावध राहाच...पण किंग कोब्रापासून अधिक सावध राहा.