मुंबई : कोरोना (Coronavirus) विरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. टेस्टिंग कुठेही कमी झालेले नाही. दोन लाख टेस्टिंग गेले जात आहे. एक कोटी 84 लाख लसीकरण राज्यात झालं आहे. 45 वर्षांच्या वर लोकांसाठी 35 हजार व्हॅक्सिंग उपलब्ध आहेत. 5 लाख दुसरा डोस द्यायचे आहेत, असे सांगत राज्यात अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा हा 6 लाखाच्या खाली आला आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्क्यांवर आले आहे. रेमडेसिवीर ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे. 6 कंपनीकडे ऑफर दिल्या आहेत, 3 लाखची ऑर्डर राज्य सरकारने दिली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, 18 - 44 वयोगटातील लसीकरण (Corona vaccine) थांबणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत.


लस केंद्राकडून उपलब्ध होत नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची लस केंद्राकडून उपलब्ध होत नाही. त्यामुळे आज 18 - 44 वयोगटातील राज्य शासनाने खरेदी केलेले कोविड व्हॅक्सिंग हे आता 45 च्या पुढच्या वयासाठी वापरले जाणार आहे. कोविडशिल्डचे 16 लाख डोस राहिले आहे, जे केंद्र सरकारने देणे बाकी आहे. काल केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यांनी व्हॅक्सिंग उपलब्ध नाहीत, असे सांगितले. त्यामुळे लसीकरणाला खीळ बसणार आहे. जशी लस उपलब्ध होईल, तसे लसीकरण करण्यात येईल, असे टोपे यांनी यावेळी सांगितले.


स्फुटनिककडे विचारणा केली होती..


लस उपलब्ध नसल्याने 18 - 44 वयोगटासाठी लसीकरणं स्लो डाऊन करावे लागेल का अशी चर्चा झाली आहे. उद्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.  दरम्यान, कोरोना उपचारानंतर वेगळा आजार पुढे आला आहे. बुरशीजन्य जो आजार आहे याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंर्तगत उपचार करता येतील का याबाबत विचार सुरु आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, असे टोपे यांनी सांगितले. तसेच स्फुटनिककडे विचारणा केली होती मात्र अजून प्रतिसाद आलेला नाही, असे ते म्हणाले.


अ‍ॅपबाबत केंद्र सरकारकडून उत्तर नाही 


कोविन अ‍ॅपबाबत लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होत आहे. 18 -44 वयोगताचे लसीकरण राज्य करत असल्याने राज्य शासनाची अशी अपेक्षा आहे की स्वतःचे अ‍ॅप असावे, या पत्राबाबत अजून केंद्र सरकारकडून उत्तर आलेले नाही. तर खासगी दवाखाने जे आहेत renewal करण्यासाठी 6 महिन्याचे registration renewal extension देण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबादमध्ये साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रक्रियेत ऑक्सिजन निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.  300 सिलिंडर बनविण्यात यश आले आहे.