मुंबई : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर विकेंडला मुंबईत पावसानं जोरदार कमबॅक केलंय. मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या उपनगरांमध्ये पावसाचा विशेष जोर पाहायला मिळतोय. तर ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतही धुवाँधार सरी बरसतायत. पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. पावसामुळे मुंबईतल्या लोकल वाहतुकीवर परिणाम झालाय. पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने धावत आहे. 


महामार्गावर पाणी, प्रचंड वाहतूक कोंडी


वसई सासुपाडामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय. वर्सोवा पुलापासून मुंबई आणि वसईच्या दिशेला वाहनांच्या ६ ते ७  किमीच्या रांगा पाहायला मिळतायत. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होतायत. 


मुंबई गोवा महामार्गावर खड्डे 


रायगड जिल्हयात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.. पहिल्याच पावसात जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढलाय.


पनवेल ते वडखळ दरम्यान रस्त्यात ठिकठिकाणी खडडे पडले असून या खडडयांतून वाहने चालवणे जिकीरीचे झाले आहे. खडडे चुकवण्याच्या नादात वाहनांना अपघात होत आहेत. एकीकडे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेले असताना दुसरीकडे खडडयांचे साम्राज्य पसरले आहे.