मुंबई : गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेहाल झालेल्या मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले असून मुंबईच्या लाईफलाईनची सेवाही विस्कळीत झाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्रे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे खोळंबली. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पावसामुळे रेल्वेसह विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार, अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. 


मुंबईतील वरळी, लालबाग, कुर्ला बस डेपो जंक्शन, एलबीएस रोड, कुर्ला वेस्ट या भागात पाणी साचलं. परेलमधील हिंदमाता भागात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सिद्धीविनायक मंदिर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. 











बीएमसीकडून आपातकालिन परिस्थीतीसाठी एक नंबर जाहीर करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी हा नंबर ट्विट केल आहे.