मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईला कालपासून झोडपून काढलंय. आजही पावसाची संततधार सुरू आहे. पुढचे आणखी काही तास असाच धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे मुंबईची लाईफलाईन सेवा विस्कळीत झाली आहे. पावसामुळे मध्य रेल्वेवरील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर वाहतूक अर्धा तास उशिरानं होत आहे. 




कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील विमान सेवा कोलमडली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंतची ३४ उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी अजूनही बंद आहे. कालपासून आत्तापर्यंत ५६ उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली आहेत.



पावसाचा जोर पाहता मुंबईतील डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ट्विट करून ही घोषणा केली. तर ठाणे आणि नवी मुंबईतील शाळाही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.