मुंबई : मुंबईत आज सायंकाळी काळोख पसरला असून त्यासोबत मुसळधार पावसाला सुरूवात झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी असा पाऊस कधीही मुंबईत पाहिला गेला नसल्याने अनेकांना धडकी भरली आहे. मात्र, लोकल सेवा अजूनही सुरळीत सुरू आहे. रेल्वेकडून लोकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


मध्य आणि पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. अचानक परतीच्या पावसाने मुंबईला धक्का दिला. सायंकाळी साडे चार वाजता अचानक आलेल्या पावसाने सर्वांनाच धडकी भरली होती. ऎन गर्दीच्या वेळी झालेल्या या परिस्थीतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.