मुंबई : पावसाची संततधार सुरुच आहे. मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असून उपनगरांमध्येही संततधार आहे. ( Rain In Mumbai ) जूनच्या पहिल्या दहा दिवसांतच महिनाभराचा पाऊस बरसला आहे. भारतीय हवामान विभागाने 13 आणि 14 जूनदरम्यान मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Monsoon  Alert ) त्यामुळे पालिका सज्ज झाली आहे. समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर आदी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियंत्रण कक्ष आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आले आहे. पाणी उपसा पंपही तयार ठेवण्यात आलेत. चाळ तसेच बैठ्या घरांच्या किंवा झोपडपट्टीच्या परिसरात पाणी साचल्यास त्यांना अन्यत्र हलवण्याकरिता पालिकेच्या ज्या शाळा तात्पुरती निवारा केंद्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत


मुंबईत गेल्या 10 दिवसातच महिन्याभराचा पाऊस झाला आहे. मान्सूनचा जोर कायम आहे. मान्सून दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झाला. पहिल्या दहा दिवसांत जूनची सरासरी ओलांडली. मुंबई उपनगरातील पावसाची सरासरी संपूर्ण जून महिन्यासाठी 505 मिलीमीटर आहे; मात्र यंदा 1 ते 11 जून, सकाळी 8.30 वाजेपर्यंत उपनगरात 534.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.  


पहिल्याच दिवशी म्हणजे 9 जूनला मुंबई उपनगरात 200 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र गेले दोन दिवस उघडझाप सुरू होती. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि उर्वरित कोकणात मुसळधार पाऊस पडणार असून पुढील काही दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.