मुंबईत जोरदार पाऊस, सखल भागात साचले पाणी
बरेच दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाचा जोर दिसून आले. पावसाने मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले.
मुंबई : बरेच दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाचा जोर दिसून आले. शहरात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. तर मुंबई उपनगरात सकाळपासून पाऊस पडत आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील या ठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसेसचे मार्ग वळवळण्यात आलेत. यात गोल देवूळ, सायन रोड नंबर २४, गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, हिंदमाता यांचा समावेश आहे.
मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळे आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. मुंबईत येत्या काही तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई दोन दिवस पाऊस पडले असे कुलाबा वेधशाळेने इशारा दिला होता. तसेच भारतीय हवामान विभागानेही मुंबईत पाऊस कोसळले, असे म्हटले होते. तसेच मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.